तारादूतांची नियुक्ती न झाल्यास आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2021

तारादूतांची नियुक्ती न झाल्यास आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        तारादूतांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, छ.संभाजी राजे, सारथीच्या संचालक मंडळ व अधिकारी यांच्यात १६ जून रोजी  पुणे येथील बैठकीत तारादूत प्रकल्प सुरू करण्याबाबत ना.पवार यांनी सांगितले होते. मात्र पंधरा दिवस होवूनही काही हालचाल नाही.

      तारादूत हे गेल्या पंधरा. महिन्यापासून बेरोजगार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सद्या हालाक्यात दिवस काढावे लागत आहेत. तारादूत राजर्षि शाहू महाराज जयंती रोजी आंदोलन करणार होते. मात्र सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे हा विषय तोवर थांबवण्यात आला होता. मात्र आता येत्या दहा दिवसांत यावर निर्णय होवून नियुक्ती पत्रे नाही मिळाली तर १५ जुलै पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल असे हर्षद सोनवणे (सारथी - जळगाव विभू) व नितीन वैद्य (सारथी - अमरावती विभाग) यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रसिद्धीला देण्यात आले आहे.No comments:

Post a Comment