सामान्य कार्यकर्त्यांचा बहुमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा, इंदुबाई नाईक झाल्या उपसभापती - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2021

सामान्य कार्यकर्त्यांचा बहुमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा, इंदुबाई नाईक झाल्या उपसभापती

इंदुबाई नाईक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बहुमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा आहे. गडहिंग्लज तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी एक सर्वसामान्य गृहिणी इंदुबाई नाईक यांची निवड करून महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याची प्रचिती आणून दिली आहे. असे मत गडहिंग्लज पं. स. सदस्य व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे यांनी व्यक्त केले.
 ना. बंटी पाटील यांनी पक्ष संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच मान सन्मान व आधार दिला आहे. 
गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ. इंदुबाई नाईक (काँग्रेस) यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल अभिनंदन करताना आमचे नेते विद्याधर गुरबे साहेब,उत्तम नाईक,प्रदीप पाटील,रंगराव नाईक,विनायक नाईक, सागर नांदवडेकर,पुंडलिक नाईक.

त्यामुळेच जिल्हाभर काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाळे दिवसेंदिवस मजबूत होत आहे. आज दि. ८ जुलै रोजी गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी एका सर्वसामान्य कुटुंबातील सौ. इंदूबाई नाईक (हेब्बाळ-जलद्याळ) यांची बिनविरोध निवड करुन घर सांभाळणाऱ्या महिलेला राजकीय क्षेत्रात संधी दिली आहे. या संधीचे त्या नक्कीच सोनं करतील अशी आशा विद्याधर गुरबे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment