जांबरे परिसरात मोबाईल कव्हरेज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2021

जांबरे परिसरात मोबाईल कव्हरेज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगडच्या पश्चिमेकडील जांबरे, उमगाव गावात जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनही  बंद अवस्थेत आहे.   त्यामुळे  विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे किंवा परीक्षा देणे अवघड झाले आहे. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर झाला आहे. तात्काळ या परिसरात फोर जि रेंज  सुरू करावी असे निवेदन भारतीय किसान संघाचे सिद्धार्थ शिंदे यांनी बीएसएनएल चे डिजीएम एस. सी. कुलकर्णी यांना दिले आहे. 

          गेली कित्येक वर्षे या जांबरे, उमगाव भागात नेटवर्क टॉवर नसल्याने सर्व ग्रामस्थ व युवावर्गाची गैरसोय होत आहे. या भागात अनेक गावे येत असून येथील ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत. मुलांना ऑनलाइन क्लास, शिक्षण, खाजगी कामे, शासकिय कागदपत्रे न मिळणे, मोबाईल सुविधेचा वापर न होणे यांसारख्या अनेक अडचणी येत आहेत. उमगाव, पेडणेकरवाडी, न्हावेली, सावतवाडी, जांबरे या गावातील युवकांनी एकत्र येत या बंद असलेल्या जिओ टॉवरसमोर नाराजी व्यक्त करत प्रशासन, राज्यसरकार व जिओ कंपनीला  इशारा दिला होता.  येत्या पंधरा दिवसांत नेटवर्क व  टॉवरसंदर्भात  विचार करावा व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 





No comments:

Post a Comment