सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षक गोंधळलेल्या अवस्थेत, स्पष्ट आदेशांची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2021

सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व शिक्षक गोंधळलेल्या अवस्थेत, स्पष्ट आदेशांची गरज

ब्रीज कोर्सच्या अभ्यासक्रमाची माहिती व तपासणी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन करताना श्री रामलिंग हायस्कूल तुडयेचे शिक्षक


तेऊरवाडी /एस. के. पाटील

           कोविड -१९ मुळे सध्या सर्वच शाळा बंद आहेत. पण विद्यार्थ्यांचे संभाव्य होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाने ब्रीज (सेतू) अभ्यासक्रम ऑनलाईन चालू केला आहे. पण ४५ दिवास चालणारा हा अभ्यासक्रम मोठ्या चर्चेत सापडला आहे. ऑफलाईन की ऑनलाईन, नियमित की ब्रीज शिकवायचा या संदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने शिक्षक व विद्यार्थी सुद्धा  गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. शिक्षण विभागाने या बाबत स्पष्ट आदेश देणे गरजेचे असल्याची मागणी आहे. 

          सध्या सर्वत्र शिक्षकांना कोविड सर्वेक्षण ड्यूटी, लसिकरण केंद्र, १० वी निकालचे काम पूर्ण झाले असले तरी  १२ वी निकालाचे काम चालू आहे या सर्वामध्ये शिक्षक व्यस्त आहेत. यातच दि. १५ पासून कोविड मुक्त गावात शाळा चालू करण्याचा आदेश आहे. १५ जूनपासून सर्वच शाळानी ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरवात केली आहे. हा पाठ्यपुस्तकातील नियमित अभ्यासक्रम ऑनलाईन चालू असतानाच शिक्षण विभागाने १ जुलै ते १४ ऑगष्टपर्यंत ४५ दिवसांच्या ब्रीज (सेतू) कोर्सची निर्मिती करून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. त्यातच शाळामध्ये ५०% शिक्षक उपस्थितीचा आदेश आहे. या सर्वामध्ये नियमित कि ब्रीज कोर्स अभ्यासक्रम पूर्ण करावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

      याबरोबरच या ब्रीज कोर्सची कोणतीच पुस्तके विद्यार्थी अगर शिक्षकांना परविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे  विना पुस्तक अभ्यासक्रम कसा पुर्ण होणार.

         इयत्ता आठवीच्या ब्रीज कोर्स पुस्तक ९५ पाणी, नववीचे ११२ पाणी तर इयत्ता १० वीचे १०८ पाणी पुस्तक आहे. एवढया मोठ्या पुस्तकांचे झेरॉक्स काडून विद्यार्थ्याना पुरवणे अशक्य आहे. ग्रामिण भागात ३० % मुलांकडे अँनरॉईड मोबाईल नाहीत तर अनेक ठिकाणी मोबाईल कव्हरेजच नाही. अशा परिस्थितीत ब्रीज कोर्स कसा पुर्ण होणार? एस. सी. ई.आर. टी यांनी बनवलेला ब्रीज कोर्स म्हणजे मागील इयत्तेतील उजळणी आहे. येथेही मागील वर्षीच्या पुस्तकांचा गोंधळ आहे. हा ब्रीज कोर्स अभ्यासक्रम पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. पण तो ऑफ लाईन, ऑनलाईन राबवण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच    हा अभ्यासक्रम शालेय स्तरावर राबवला जातोय की नाही याची तपासणी बीआरसी विभागाच्या तज्ञ शिक्षकांकडून शाळेमध्ये चार विद्यार्थ्याना बोलावून केली जात आहे. या संदर्भात शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिल्यास हा गोंधळ निश्चित थांबू शकतो.

No comments:

Post a Comment