![]() |
डॉ. वंदना गुरव |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन मध्ये आयोजित दहावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरात शनिवार दि. १० रोजी ११ वाजता शिनोळी येथील 'वैजनाथ नर्सिंग होम'च्या संचालिका डॉ. वंदना निवृत्ती गुरव यांचे 'कोरोना काळात विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी' ? या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे. त्यांचे जन्मगाव तुडये असून प्राथमिक शिक्षण कालकुंद्री येथे झाले. त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय मध्ये पहिल्या बॅचमध्ये शिक्षण घेतले. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण नरसिंगराव भुजंगराव पाटील जुनियर कॉलेज, चंदगड येथे तर बीएचएमएस पदवी बेळगावच्या भरतेश मेडिकल कॉलेजमध्ये घेतली. गेली पंधरा वर्षे शिनोळी येथे स्त्री रोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कुद्रेमानी साहित्य संमेलन व बेळगावच्या वि. गो. साठे साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा म्हणून पद भूषविलेले आहे. तर मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीच्या सदस्या आहेत. त्यांना बेळगावच्या जायंट सखीतर्फे आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन गौरविले आहे. https://youtube.com/channel/UC7iEH4bUjCqfnhnkN3YiNvg
https://www.facebook.com/profile.php?id=100004128009177
https://meet.google.com/yss-bnap-hdw या लिंकवर शनिवारी सकाळी 11 वाजता जॉईन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment