धनगरवाडा येथे बिबटयाच्या हल्यात दोन शेळया गंभीर जखमी, कोठे घडली घटना, वाचा.......... - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

धनगरवाडा येथे बिबटयाच्या हल्यात दोन शेळया गंभीर जखमी, कोठे घडली घटना, वाचा..........

 

पार्ले (ता. चंदगड) येथील धनगरवाडा येथे बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या शेळी व शेतकरी

चंदगड /  सी. एल. वृत्तसेवा

           पार्ले (ता. धनगरवाडा) येथील सोनु निनु फोंडे या शेतकर्‍याच्या दोन शेळीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्या.हि घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.सोनु फोंडे यांची पत्नी पत्नी सौ.सावी फोंडे या वनहक्कामधुन मिळालेल्या जमिनी लगत असणाऱ्या मालकी क्षेत्रात शेळ्या चारत असाताना बिबटयाने अचानक हल्ला करुन दोन शेळयांना गंभीर जखमी केले आहे. 

         शेळ्यांच्या मानेत दातांचे खोलवर जखमा झाल्या आहेत. तसेच अंगावर इतरत्र नखांचे ओरखडे उठले आहेत. सौ. सावी या महिलेने आरडा-ओरड केल्या नंतर ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांच्या आवाजाने बिबटयाने जंगलामध्ये धुम ठोकली. याबाबतची माहिती कळताच प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील,वनपाल. बी. आर. भांडकोळी , वनरक्षक गणेश बोगरे, शेखर बोंद्रे, व वनकर्मचारी अर्जुन पाटील आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शासकीय नियमानुसार श्री. फोंडे यांना नुकसान भरपाई देणार असलेचे सांगीतले. तसेच पशुवैधकीय अधिकारी यांचेकडुन उपचार करुन घेणे बाबत सुचना केल्या. पार्ले जंगल परिसरात बिबटयाचा वावर असुन, स्थानिकांनी गुरे व बकरी चारण्याकरीता व इतर कारणास्तव वनक्षेत्रात जाऊ नये व जरुरती दक्षता घेण्याचे आहावन प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment