शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

प्रभाकर खांडेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           शिनोळी (ता. चंदगड) येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांचा १ ऑगस्ट २०२१ रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाकर खांडेकर फौंडेशन चंदगड व साई क्लिनीक मल्टी स्पेशालिटी क्लिनीक शिनोळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ९ ते ३ या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. 

       १ ऑगस्टचा श्री. खांडेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कोवीड -१९ मुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने प्रभाकर खांडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. हे रक्तदान शिबीर खांडेकर कॉम्प्लेक्स शिनोळी (ता. चंदगड) येथे होणार आहे. कोरोनाच्या काळात रक्ताचा पुरवठा भरुन निघण्याबरोबर अनेकांचे प्राण रक्तदानामुळे वाचणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान देऊन कोरोनाशी लढुया असे आवाहन केले आहे. No comments:

Post a Comment