आरोग्य विभागामार्फत अडकूरमध्ये ग्रामस्थांची कोरोणा चाचणी, कोरोनाची साखळी तोडण्याला होणार मदत.......... - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

आरोग्य विभागामार्फत अडकूरमध्ये ग्रामस्थांची कोरोणा चाचणी, कोरोनाची साखळी तोडण्याला होणार मदत..........

कोरोणा चाचणी पथक

अडकूर /  सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपययोजना राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत अडकूर (ता. चंदगड) येथे प्रत्येक कुंटूब प्रमूखांची कोरोणा चाचणी घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, अडकूर आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ उपस्थित होते.

          आज सकाळी या मोहिमेला सुरवात करण्यात आली. यासाठी प्राथमिक शिक्षक, श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे शिक्षक, तलाठी, परिसरातील ग्रामसेवक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत शिपाई, अंगणवाडी व अशा सेविका, पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य  व कोरोणा दक्षता समिती यांची मदत घेण्यात आली. यावेळी ३६० जणांचे आरटीपीसीआर घेण्यात आले.

No comments:

Post a Comment