संदीप सकट यांची “शासन का राशन बचाओ आंदोलनच्या” चंदगड तालुका अध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2021

संदीप सकट यांची “शासन का राशन बचाओ आंदोलनच्या” चंदगड तालुका अध्यक्षपदी निवड

 

संदीप सकट

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      किटवडे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सकट यांची ``शासन का राशन बचाओ`` आंदोलन या सामाजिक संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी  निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संघटनेचे प्रमुख कार्यवाहक राजेश कांबळे यांनी दिले आहे.

          संदीप सकट हे अनेक वर्ष तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सामाजिक कार्यात, विविध आंदोलनात सक्रीय राहून कार्य करतात. त्यांच्याकडे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (DPI) या कार्यक्षम पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख हे पद आहे. या काळातील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना “शासन का राशन बचाओ आंदोलन” चंदगड तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

       चंदगड तालुक्यातील अन्न धान्य वाटप, रेशनिंग वाटप हे गरजू लोकांपर्यंत पोचते का, गोर गरिबांना त्याचा लाभ होतो का, तसेच यांच्या वाटपात होणारा भ्रष्ट्राचार या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण सतत कार्यक्षम राहू व शासनाचा अन्न धान्य रेशन गरजू व होतकरू लोकांपर्यंत कसे पोचवता येईल. यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे संदीप सकट यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment