पार्ले ग्रामपंचायतीमध्ये नागरीकांची कोरोना चाचणी - चंदगड लाईव्ह न्युज

05 July 2021

पार्ले ग्रामपंचायतीमध्ये नागरीकांची कोरोना चाचणी

पार्ले (ता. चंदगड) येथे नागरीकांच्या कोरोना टेस्ट करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          पार्ले (ता. चंदगड) ग्रामपंचायत येथे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अँन्टीजन व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये गावातील ८० लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या. 

         यावेळी  तहसीलदार विनोद रणवरे, हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची टीम, हेरे तलाठी, पार्ले  ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी व माजी तंटामुक्त अध्यक्ष सुधाकर गावडे, त्याचबरोबर ग्रामपंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते.गावच्या सरपंच सौ. समृद्धी सुधाकर गावडे, उपसरपंच सौ. धनश्री एकनाथ गावडे, ग्रा. प. सदस्य खाचू  रवळू गावडे, इतर सदस्य ,तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment