अडकूर येथील खोदलेला रस्ता वाहतुकीला धोकादायक, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2021

अडकूर येथील खोदलेला रस्ता वाहतुकीला धोकादायक, रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

   अडकुर येथील खोदकाम केलेल्या रस्त्याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन देताना ग्रामस्थ.

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      अडकूर (ता. चंदगड) येथील फुलबाग गल्लीचा रस्ता खोदून एक महीना झाला आहे. पण रस्त्याच्या कामाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे लोकांना रहदारी करणे धोकादायक झाले आहे. काही या ठिकाणी पडले आहेत. तसेच व्यापारी लोकांच्या व्यापारावर परिणाम होत आहे. पंधरा जून रोजी खोदकाम सुरू केले.  आता एक महिना संपला. ऐन पावसाळ्यात या ठिकाणी जा-ये करणा-या लोकांना त्रास होत आहे. हे काम केंव्हा पूर्ण करणार याची माहिती ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात द्यावी असे ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संदिप घोरपडे, सुहास घोरपडे, संजय चिलगोंडे, अंकुश कदम, शाहीनमाज जमादार, सागर पाटील, सतिश पवार, वैभव यादव, गोपाळ सुतार, अंकुश सोनार, गोविंद आंबीटकर, सुरेश घोरपडे इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:

Post a Comment