तुर्केवाडी येथे गोवा बनावटीची दारू जप्त, २लाख ३२हजाराचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

तुर्केवाडी येथे गोवा बनावटीची दारू जप्त, २लाख ३२हजाराचा मुद्देमाल जप्त

 


चंदगड/प्रतिनिधी 
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना चंदगड पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 32 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात  आला. विशाल सुरेश गोंधळी ( रा. विठल रुकमाई गल्ली, नागनवाडी, ता. चंदगड) व वैभव चव्हाण ( रा.करेकुडी, ता.चंदगड) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तुर्केवाडी येथे मोहन खोत यांच्या घरासमोर आरोपी विशाल सुरेश गोंधळी हा त्याचा मित्र वैभव चव्हाण  याच्या सांगण्यावरुन कुद्रेमनी फाटा येथुन महीद्रा कंपनीची मालवाहु जितो गाडी (एम.एच ०९ ई.एम ००७२) या गाडी मधून गोवा बनावटीची दारू विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहतूक करत असल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळाली ,त्यानुसार चंदगड पोलिसांनी  सापळा रचून गाडी पकडली. या गाडीत १ लाख ७९ हजार २००रुपयांची  रिझर्व्ह सेवेन कंपनीचे १२ बॉक्स, ५३ हजार ७६०रुपयांचा गोल्डन आईस व्हीस्की कंपनीचे १० बॉक्स, व १ लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण  २लाख ३२ हजार ९६०रुपयांचा मुद्देमाल पकडला.अधिक तपास  हवालदार पाटील करत आहेत.
No comments:

Post a Comment