कोल्हापुरी शब्दसरी मंच आयोजित काव्यलेखन स्पर्धेत गडचिरोलीच्या संगीता रामटेके प्रथम, नागपुरचे केशव डफरे द्वितीय - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2021

कोल्हापुरी शब्दसरी मंच आयोजित काव्यलेखन स्पर्धेत गडचिरोलीच्या संगीता रामटेके प्रथम, नागपुरचे केशव डफरे द्वितीय

संगीता रामटेके

केशव डफरे

सुभद्रासुत आंधळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कोल्हापुरी शब्दसरी मंचच्या वतीने बारवाड येथील कवी व पत्रकार रंगराव बन्ने यांचा वाढदिवस व आषाढी एकादशी असा दुग्ध शर्करा योग साधून दि. 20 रोजी आषाढी एकादशी दिवशी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत गडचिरोलीच्या संगीता रामटेके यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

         तर द्वितीय केशव डफरे नागपूर, तृतीय सुभद्रासुत आंधळे अहमदनगर यांनी पटकावला. उत्तेजनार्थ तृप्ती पाटील उल्हासनगर मुंबई, युवराज पाटील चंदगड यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून निवेदक, गीतकार, लेखक, समीक्षक, स्तंभलेखक व पत्रकार रानकवी जगदीप वनशिव पुणे यांनी काम पाहिले.

         तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समूह प्रमुख दशरथ (आण्णा ) कांबळे चंदगड, मुख्य समूह प्रशासिका स्वाती कोरगावकर कोल्हापूर, मुख्य समूह प्रशासक संजय साबळे चंदगड, समूह प्रशासिका रोहिणी पराडकर कोल्हापूर यांनी परिश्रम घेतले. तर स्पर्धेचे संकलन सिद्धेश पाटील कोल्हापूर यांनी केले. यशस्वी स्पर्धकांबरोबर सहभागी कवी कवयित्रींना उत्कृष्ठ प्रकारे प्रमाणपत्र देण्यासाठी शिवानी काणकेकर कोल्हापूर यांनी उत्कृष्ठ प्रकारे ग्राफिस्क विभाग सांभाळले.

         या स्पर्धेत कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग, बेंगलोर, गडचिरोली आदी परिसरातून जवळजवळ २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.No comments:

Post a Comment