![]() |
हलकर्णी फाटा ता.चंदगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, बाजूला माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील,सरचिटणीस नाथाजी पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आता उद्भवलेली पूर परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. अशी घणाघाती टीका शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली. चंदगड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
![]() |
कोवाड ता.चंदगड येथे पूरग्रस्त व्यापाऱ्यांशी हितगुज साधताना जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बसलेले माजी मंत्री भरमू पाटील, शिवाजीराव पाटील |
यावेळी माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, शिवाजीराव पाटील,जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. घाटगे यांनी ``तळगुळी व नागरदळे येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेसह युवकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. तसेच पूर बाधित व अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेती व पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.``
विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये आलेल्या पूर परिस्थिती मध्ये त्वरित मदत देण्यात आली होती. तसेच सामाजिक व सेवाभावी संस्था मार्फत मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या पातळीवर सुद्धा राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आतातरी राज्य शासनाने तातडीने पावले उचलून भाजप सरकारने २०१९ मध्ये काढलेल्या जीआर प्रमाणे किमान कारवाई कार्यवाही करावी, या दौऱ्यात त्यांनी तळगुळी वाढ कोवाड नागतळी ढोलगरवाडी आदी गावांना भेटी दिल्या.
राज्य सरकार कड्न पूर नियंत्रणासाठी नद्यां जवळ उभारण्यात येणाऱ्या भिंतीच्या संकल्पनेची श्री घाटगे यांनी खिल्ली उडवली व त्यापेक्षा ज्या उपाय योजना व्यवहार्य आहेत त्या तातडीने राबवाव्यात. यामध्ये नद्यांमधील गाळ काढणे नदीपात्रात शेजारील अतिक्रमणे पाठवणे नवीन बांधकामे करू न देणे. आदींचा समावेश करता येईल.
No comments:
Post a Comment