चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नाशिक येथील श्री सनातन विद्या फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. यावर्षी जोतिषशास्त्रात चांगले काम करणाऱ्या कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. दिपाली गुरव यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार रविवारी २५ जुलै २०२१ रोजी वितरीत करण्यात आला.
![]() |
ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर. |
जोतिषी सौ. दिपाली गुरव याचे गाव सिंधुदुर्ग तालुक्यातील कुडाळ हे आहे. त्यांचे माहेर सातवणे (ता. चंदगड) येथील आहेत. त्यांनी गुरु गुरू प्रसन्नजी मुळे रत्नागिरी यांच्याकडे २००२ पासून शिक्षण घेतले आहे. गेली १८ वर्षे त्या ज्योतिष शास्त्राविषयी लोकांना मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षभरापासून सातत्याने त्यांचे राशिभविष्य विविध दैनिकात व पोर्टल चॅनेलवरही त्या सातत्याने लिखाण करत आहेत. टीव्ही चॅनेलवरही त्यांनी प्रासंगिक मुलाखती दिल्या आहेत. त्याच्या या कार्याची दखल घेवून नाशिक येथील सनातन विद्या फाउंडेशनच्या वतीने `तेजोवलय` पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सी. एल. न्युज (चंदगड लाईव्ह न्युज) च्या वाचकांसाठी त्या गेल्या वर्षभरापासून राशिभविष्य लिहीत आहेत. वाचकांनी वेळोवेळी आपल्याला आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्यानंतर योग्य मार्गदर्शन केले आहे.
No comments:
Post a Comment