'असे हे जीवन' या पुस्तकाचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2021

'असे हे जीवन' या पुस्तकाचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन

पुस्तक प्रकाशन वेळीं नामदार हसन मुश्रीफ, संत गजानन शिक्षण समूहाचे अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण, सचिव ॲड बाळासाहेब चव्हाण व इतर


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        पंढरपूर (सोलापूर) येथील ज्येष्ठ साहित्यिक जीवन पाटील यांच्यावरील 'असे हे जीवन' या आत्मचरित्राचे प्रकाशन नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गडहिंग्लज  येथे करण्यात आला.

    'अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत शून्यातून विश्व निर्माण करणारे जीवन पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानदान  व प्रशासनाचे कार्य करीत समाज घडविण्याचे कार्य केले त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्र प्रेरणादायी असल्याचे मत नामदार हसन मुश्रीफ यांनी पुस्तक प्रकाशनावेळी व्यक्त केले.

        जीवन पाटील यांचे यापुर्वी आश्राफ,राही पैलवान,हे कादंबरी तर लक्ष्मी कथासंग्रह व नियतकालिकेतून कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुभाष धुमे, संतोष पवार,संत गजानन शिक्षण समूहाचे अध्यक्ष ॲडआण्णासाहेब चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, प्रा. अजिंक्य चव्हाण, विकास बावची कर, अनिल आजगेकर, प्रदीप गोरुले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment