विधवा, परितक्त्या महिलांची डिसेंबर पासून पेन्शन बंद, पेन्शन सुरु करण्याची आमदारांच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2021

विधवा, परितक्त्या महिलांची डिसेंबर पासून पेन्शन बंद, पेन्शन सुरु करण्याची आमदारांच्याकडे मागणी


माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड तालूक्यातील कोरोना काळात सर्वच मोलमजुरी करून जगणाऱ्या चंदगड तालुक्यातील विधवा, परितक्त्या या महिलांची पेन्शन गेल्या डिसेंबर महिन्यापासून  बंद केली आहे. या प्रकरणी आमदार राजेश पाटील यांनी लक्ष देेऊन पेन्शन सूूूरू करवी अशी मागणी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटने मार्फत करण्यात आली आहे. 

          विधवा,परितक्त्या महिलांची मुले २५ वर्ष वयाची झाल्याचे कारण देऊन पेन्शन बंद करण्यात आली आहे. पण सर्वच मुले आई वडीलांना सांभाळणारी असतात असे नाही. जगात ओढवलेल्या कोरोना महामारीने सर्व व्यवहार बंद असल्याने पेन्शनवर आवलबूंन असणाऱ्या महिलांनी जगायचे कसे हा प्रश्न पडला आहे. या प्रकरणी लक्ष देऊन सर्व पेन्शन धारकांना न्याय द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना उपकार्याध्यक्ष जोतिबा गोरल, चंदगड तालुका अध्यक्ष लक्ष्मण बेनके, उपाध्यक्ष संदिप पाटील यांनी केली आहे.



No comments:

Post a Comment