चंदगड तालुक्यातील नागरदळे गावामध्ये विकासाची पायाभरणी करून जनमानसात नावारुपाला आलेले लोकनेते गावचे विद्यमान सरपंच दिलीप मारुती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत...!!
![]() |
दिलीप मारुती पाटील |
नेहमी प्रकाशात उजळनाऱ्या चेहऱ्याच्यामागे काळाकुठं अंधाराशी केलेला संघर्ष दडलेला असतो. अशाच संघर्षातुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणारे नागरदळेतील युवा नेतृत्व दिलीप मारुती पाटील यांचे नाव आज आग्रहाने घेतल जात.समाजासाठी झगडणारी माणसं कर्तृत्ववान असतात. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड, शालेय जीवनात अन्यायाविरुद्ध बंड पुकारने, रोखठोक स्वभाव, कुणासमोर न झुकता योग्य न्याय हीच नीती हे तत्व सांभाळत आपली नवी ओळख समाजासमोर मांडणारा नवकोरा चेहरा आज खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात येत आहे.
नागरदळेत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेकांनी आपल्या कार्याने गावचे नाव उज्वल केले आहे. गेल्या १५-१६ वर्षापासून आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दिलीप पाटील हे व्यक्तीमत्व नावारुपाला येत आहे. दिलीप पाटील यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची, त्यात एकुलता एक पण तरीही त्यातून आपली घरची कामे सोडून सतत प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हा स्वभाव गावात प्रत्येकाला हवाहवासा वाटू लागला. घरातून कोणतीही राजकीय घराणेशाही नसताना देखील आपली राजकीय क्षेत्रात दिलीप पाटील यांनी वेगळी छाप पाडली आहे.
आपला गाव गुण्यागोविंदाने एकत्र रहावा, गावात विविध कार्यक्रम राबवले जावेत व गावातील मुलांना एक चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी सन् २००६ साली दिलीप पाटील यांनी गावात जय दुर्गामाता युवक मंडळाची स्थापना केली. दरवर्षी मंडळामार्फत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, समाज प्रभोधनपर कार्यक्रम राबवीले जातात. तसेच विविध पदावरून सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा सन्मान केला जातो. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. सलग ११ वर्ष अध्यक्षपद भूषवून दिलीप पाटील यांनी मंडळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. आजही गावातील महिला वर्ग, अबालवृद्ध, शालेय विद्यार्थी, मुंबई- पुणे ग्रामस्थ, तरुण युवक या मंडळाशी जोडले गेले आहेत.
गावात कोणतीही घटना घडली असो, कोणतेही कार्य असो, कुणाचीही अडचण असो दिलीप पाटील नेहमी पुढे असतात. गावात काहीही बरे वाईट झाले तरी त्यावर मार्ग काढण्यासाठी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव दिलीप पाटील. गावासाठी काहीतरी करून दाखवन्याची त्यांची तळमळ व काम पाहून गावातील जनतेने त्यांना मोठी संधी दिली.
एक सामान्य घरातून घडलेले दिलीप पाटील ऑक्टोबर २०१७ साली पाहिल्यानंदाच थेट गावच्या जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून पूर्ण तालुक्यात ३६१ मतांनी विक्रमी आघाडी घेऊन निवडून आले. संपूर्ण गावाने त्यांना न भूतो, न भविष्यते सरपंच पदावर बसविले. आज सरपंच म्हणून गेली चार वर्ष अतिशय संयमाने यशस्वीरित्या गाव सांभाळत आहेत. प्रत्येकाची अडचण समजून त्यातून मार्ग काढून सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे आहेत. आपल्या पदाला कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता गावच्या प्रत्येक प्रश्नाला दिलीप पाटील न्याय देत आहेत. योग्य व अचूक कामाची मुद्देसूद मांडणी व प्रत्येक विषयाचा अभ्यास हे खास वैशिष्ट्य. मागील वर्षी कोराेना काळात चार महिने दिवस रात्र मेहनत घेऊन स्वतः पुढाकार घेऊन काेरोना दक्षता कमिटी मार्फत जबाबदारी पूर्वक आपले काम सांभाळले. गावचे प्रथम नागरिक या नात्याने अहोरात्र थांबून गावची सेवा बजावली. आपला गाव कसा सुरक्षित राहील याकडे लक्ष घालून कोरोनापासून गावाला मुक्त केले.
सामान्य कुटुंबातुन दिलीप पाटील घडलेले असले तरी एक युवा नेतृत्व, गावच्या विकासाची तळमळ असणारा, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारा एक तडफदार सच्चा नेता म्हणून त्यांच्याकड़े पाहिल जात. नेहमी गावासाठी झटण्याची तळमळ, कुणा अडल्या नड्लेल्या सतत धाउन मदत करने, तालुक्याच्या ठिकाणी सतत ये जा करून गावकऱ्यांची नडलेली कामे सतत सफल पद्धतीने पार पडणारा आणि सर्वांच्या सुख दुखात हीरहीरीने सहभागी घेणारा नागरदळे गावचा हा एकमेव चेहरा आहे.
विशेष म्हणजे एक उत्कृष्ट कब्बड्डीपट्टू, क्रीडा संघटक, आयोजक, उत्तम मार्गदर्शक व सर्व सामान्यांचे आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या अगदी ३५ व्या वर्षी सरपंच पदावर विराजमान होण ही खरच आभिमानाची गोष्ट आहे. माननीय श्री दिलीप पाटिल साहेब आपली सामाजिक व राजकीय कारकीर्द पाहता आपल्या हातून अशीच जनसेवा होईल आणि पुढील पिढीसाठी आपले नाव भूषणावह होईल हे वास्तव नाकारता येत नाही. दिलीप पाटील साहेब पुढील भविष्यासाठी खूप शुभेच्छा व आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
*"दुनिया उसके कद का*
*अंदाज ना लगा सकी,*
*वो आसमां है मगर*
*सर झुकाएं रहता है"..!!*
शब्दांकन- एस. एस. गुरव, नागरदळे (ता. चंदगड)
No comments:
Post a Comment