प्रवाशांच्या सोयीसाठी चंदगड आगारातून सायंकाळी ५ वाजता चंदगड- निगडी एसटी बस - आगार व्यवस्थापक अमर निकम - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2021

प्रवाशांच्या सोयीसाठी चंदगड आगारातून सायंकाळी ५ वाजता चंदगड- निगडी एसटी बस - आगार व्यवस्थापक अमर निकम


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        गेल्या काही वर्षात चंदगड आगाराच्या सायंकाळी सुटणाऱ्या पुणे, मुंबई, भाईंदर, बोरीवली आदी गाड्या बंद आहेत. परिणामी खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांना चढ्या दराने तिकीट आकारणी केली जात असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रवाशी वर्गातून तक्रारी वाढत असून मार्गावरील प्रवाशांतून गेल्या काही दिवसापासून चंदगड निगडी-रातराणी बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. या मागणीचा विचार करून चंदगड आगाराचे नूतन व्यवस्थापक अमर निकम यांनी एक जुलै पासून चंदगड- निगडी रातराणी बस सेवा सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. ही बस चंदगड मधून रोज सायंकाळी ५.०० वाजता सुटेल तर निगडी हून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता निघून रात्री ९.०० वाजता चंदगड येथे पोहोचेल. या बससेवेचे ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले असून प्रवाशी बांधवांनी खाजगी वाहतुकीला बळी न पडता शासकीय सुरक्षित व निर्धास्त बससेवेचा लाभ घ्यावा  असे आवाहन आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment