वाकोबा पाटील यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदाय हळहळला - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2021

वाकोबा पाटील यांच्या जाण्याने वारकरी सांप्रदाय हळहळला

 

वाकोबा इराप्पा पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 सुंडी (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ  वारकरी वाकोबा इराप्पा पाटील (वय 87) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. कोवाडसह चंदगड तालुक्यात वारकरी सांप्रदायात मोठे काम करणाऱ्या या ज्येष्ठ वारकऱ्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, पत्नी, नातवंडे, असा परिवार आहे. भारतीय दूरसंचार निगमचे निवृत्त टेलीफोन तंत्रज्ञ विठ्ठल पाटील यांचे ते वडील तर सुंडी (ता. चंदगड) येथील वझर धबधबा पर्यटन स्थळ कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील यांचे ते काका होत. ते कोवाड मधील पारायण मंडळाचे सदस्य होते. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते. गावात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. तसेच ते गावातील हरिनाम सप्ताहाचे अधिष्ठाता होते. गावातील जय हनुमान संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट धुरा सांभाळली होती.No comments:

Post a Comment