आमदार राजेश पाटील यांनी घेतला चंदगड मतदारसंघातील पुरस्थितीचा आढावा - चंदगड लाईव्ह न्युज

26 July 2021

आमदार राजेश पाटील यांनी घेतला चंदगड मतदारसंघातील पुरस्थितीचा आढावा

चंदगड विधानसभा मतदार संघातील पुरस्थितीचा परग्रस्थ भागात जाऊन आढावा घेताना आमदार राजेश पाटील

एस. के. पाटील / तेऊरवाडी -प्रतिनिधी

        कोल्हापूर जिल्हयात कोरणाचे थैमान आणि त्यात गेले चार दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. अशा पुरजन्य परिस्थितीत घरात बसून न राहता व ड्रायव्हर नसतानासुद्धा पुरात अडकल्याना धिर देण्यासाठी आणि पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघात आमदार राजेश पाटील यानी स्वतःच आपल्या गाडीचे सारथ्य करत दौरा केला.

      अतिवृष्टीने संपूर्ण चंदगड विधानसभा मतदार संघ जलमय झाला. अतिवृष्टी तसेच पुराचे पाणी यामुळे तर कोवाड सारखी मोठी तसेच गजबजलेली बाजारपेठ पाण्याखाली गेली. कोवाडबरोबर दुंडगे, कानडी, अडकूर येथील अनेक कुटुंब तसेच हजारो लोक स्थलांतरित केले गेले. काही ठिकाणी तर  २०१९ पेक्षाही भयानक परिस्तिथी ओढवली. ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे भागात नदी नाले तुडुंब भरून दळणवळणाचे सर्व संपर्क साधने तूटलेली होती. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश नरशिंगराव पाटील यांनी नेहमीचा ड्रायव्हर नसतानासुद्धा स्वत: गाडी  बाहेर काढली आणि जि. प. सदस्य अरूण सुतार, तानाजी गडकरी, अभय देसाई या ज्येष्ठ सहकार्‍यांना सोबत घेऊन कोवाड, दूंडगे व अडकूर भागांना भेटी द्यायचा सपाटा लावला . तसेच कानडी गावात  मोठ्या प्रमाणात झालेल्या घरांची पडझड प्रत्येक ठिकाणी जाऊन भेट देऊन व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सूचना केल्या. त्यांना योग्य ते अत्यावश्यक साहित्य व योग्य ती मदत लवकरात लवकर आपल्याकडून, प्रशासन, सेवाभावी संस्था किंवा लोकसहभागातून  मिळवून देऊ  असे सांगितले.

          तत्पूर्वी जकनट्टी -निटूर दरम्यान असलेल्या नाल्याला अचानक व मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्या नाल्यात एक महिला व कडलगे लगत नागरदळे चा युवक. वाहून गेल्याची बातमी कळताच आमदार पाटील यानी तात्काळ जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याशी संपर्क साधून NDRF पथक तातडीने बोलवून घेऊन अपघातग्रस्तांच्या शोध घेण्याच्या सूचनाच केल्या नाहीत तर मोहीम तडीस नेली.

        हिटणी (ता. गडडिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीच्या पूरस्थितीची  विभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना अधिकाऱ्यानं सोबत पहाणी करून पूर बाधित ग्रामस्थ यांच्या सोबत संवाद साधून त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

       सलग चार दिवस कोणत्याच आपत्तीची पर्वा न करता मतदारसंघात फिरून मतदार संघातील लोकांना सुरक्षित ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य मानत नागरिकांची सुव्यवस्था करणे ही आपली जबाबदारी असून माझा मतदारसंघ हेच माझं कुटुंब असल्याचे सांगताना ते भावुकसुद्धा  झाले. कोरोना सारख्या महामारीत माणूस माणसाला भेटायचा बंद झाला असताना, प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा असणारा, ध्येयवेडा, समाज व राष्ट्राच्या निर्मितीत व्यक्ती किंवा व्यक्तीसमूहाला नवी दिशा प्रदान करणारा, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी, शब्दाला, वेळेला, कर्तव्याला कायमस्वरूपी असा जगलेला लोकनेता लाभलेल्या आमदार राजेश पाटील यांचे कार्य खरचं कौतुकास पात्र आहे.



No comments:

Post a Comment