मुलीच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तु देताना डाॅ. पाटील.
माणगाव / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्याला अध्यात्मिक साहित्याची ओळख करून देणारे ह-भ-प. डॉक्टर विश्वनाथ पाटील (रा. मजरे जटेवाडी) यांनी आपली कन्या कुमारी ज्ञानेश्वरी हिच्या वाढदिवसानिमित्त बागीलगे डुक्करवाडी विद्यालय बागीलगे येथील विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्जंतुक पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी छोटे दोन वॉटर टँक शाळेला भेटीदाखल दिल्या.
आज समाजात वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त भारतीय संस्कृतीला लाजवेल अशी कृत्य होत चालली आहेत. ती कुठे तरी थांबली पाहिजेत. यासाठी समाजातील जागरूक पालकांनी अशा कृत्यांवर आळा घालण्यासाठी आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार रुजवावेत अशी अपेक्षा यावेळी डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली.
वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्चाला फाटा देत शैक्षणिक उपक्रमाला हातभार म्हणून त्याने डॉक्टर पाटील यानी घेतलेल्या या निर्णयाबद्दल कौतुक होत असून बागीलगे डुक्करवाडी विद्यालयाचे प्राचार्य श्री एस एल पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून कु. ज्ञानेश्वरी हिला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बागिलगे डुक्करवाडी विद्यालयाचा शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment