![]() |
सद्भावना दिनानिमित्त शपथ घेताना. |
चंदगड / प्रतिनिधी
र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सद्भावना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वांना सद्भावना दिनाची शपथ दिली. निरोगी भारत, सुंदर भारत या ब्रीद अंतर्गत उपस्थितांना या दिनाचे महत्व समजावून दिले. सर्वधर्मसमभाव, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता, बंथुभाव या गोष्टींचे पालन करू व मानवी आरोग्य, निसर्ग संरक्षणाची जपणूक करण्यास शिकू आणि शिकवू असा सर्वानी संकल्प केला. कार्यक्रमासाठी प्रा. एस. के. सावंत, प्रा. एस. एम. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. टी. एम. पाटील, डाॅ. आर. एन. साळुंखे, प्रा. आजरेकर, कपिल पाटील, परशराम भरमगावडा इ. प्राध्यापक-प्राद्यापकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन कोल्हापुर जिल्हा समन्वयक व प्रकल्प अधिकारी प्रा. संजय एन. पाटील यांनी केले. आभार प्रा. टी. एम. पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment