दिंडलकोप मराठी शाळेची विद्यार्थीनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2021

दिंडलकोप मराठी शाळेची विद्यार्थीनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र

यशस्वी विद्यार्थ्यींनी मंगल हिचे अभिनंदन करताना शिक्षकवर्ग. 

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड तालुक्यातील दुर्गम अशा दिंडलकोप मराठी शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी मंगल भिमराव जरळी ही ११९ गुणासह NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली आहे.

मराठी विद्यामंदिर दिंडलकोप शाळेतून एकूण १२ विद्यार्थी परीक्षेस बसविले होते. पैकी ५ विद्यार्थी पास झाले. वर्गशिक्षक  बाळू हरीबा प्रधान, मुख्याध्यापक  तानाजी जाधव, अध्यक्ष पाच्चासो काजी यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून चंदगड तालुक्‍यातून उत्तीर्ण होणारी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. याबद्दल तिचे विशेष कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment