बेळगाव-वेगुर्ला मार्गावरील नागनवाडी येथे झालेल्या अपघातात कुद्रेमानीचा युवक जागीच ठार - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2021

बेळगाव-वेगुर्ला मार्गावरील नागनवाडी येथे झालेल्या अपघातात कुद्रेमानीचा युवक जागीच ठार

मारुती यळ्ळूरकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      बेळगाव - वेंगुर्ला रस्त्यावरील नागणवाडी (ता. चंदगड) गावाच्या वेशीत असलेल्या वळणावर महिंद्रा पीक अप आणि दुचाकी या वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरून जाणारा मारुती संजय यळ्ळूरकर (वय -२२, रा. कुद्रेमानी ता. जि. बेळगाव) हा युवक जागीच ठार झाला. 

     मारुती हा चंदगडहून  दुचाकी (क्र. के ए २२- जी- ४५०२) वरून आपल्या कुद्रेमानी या गावी जात होता. तर महिंद्रा पिक अप टेम्पो बेळगावहून चंदगडला जात होता. वळणावर संजयला आपल्या गाडीचा वेग आवरता आला नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या टेम्पोला जोराची धडक बसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment