पूरग्रस्तांना केलेली मदत हीच खरी नरसिंगरावाना श्रद्धांजली ठरेल - आमदार राजेश पाटील, म्हाळेवाडी व यशवंतनगर येथे अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2021

पूरग्रस्तांना केलेली मदत हीच खरी नरसिंगरावाना श्रद्धांजली ठरेल - आमदार राजेश पाटील, म्हाळेवाडी व यशवंतनगर येथे अभिवादन

म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे स्व. नरसिंगराव पाटील यांच्या स्मृतिदिना प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          स्व. नरसिंगराव पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदार संघात अनेक लहान मोठी धरणे बांधून हरितक्रांती केली आहे. सहकार, शैक्षणिक, क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. अनेक गोरगरिबांना नोकऱ्या देऊन संसार फुलवले आहेत. अलिकडच्या काही वर्षात महापुराने शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यांना सावरण्यासाठी आज मदतीची खरी गरज आहे. सर्वांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देऊया हीच स्व.नरसिंगराव पाटील याना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन आ. राजेश पाटील यांनी केले. म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे माजी आमदार स्व. नरसिंगराव पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  इतर सर्वच कार्यक्रम रद्द आले होते. 

यशवंतनगर (ता. चंदगड) येथे स्व. नरसिंगराव पाटील यांच्या समाधीस्थळी कर्मचाऱ्यांनी श्रध्दांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थित कर्मचारी. 

               नरसिंगराव  यांच्या प्रतिमा व अर्ध पुतळ्याचे  पूजन आ. पाटील व सौ. सुस्मिता राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना पाटील यांनी कोरोनाने निधन झालेल्या वारसांना व अनाथांना आणि  पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले.

                                              जाहिरात

जाहिरात

           यावेळी तानाजी गडकरी, एस. एल. पाटील, बंडू चिगरे, परशराम पाटील, विष्णू आढाव, द, परशराम पाटील,  जानबा चौगुले, अनिल सुरुतकर, सरपंच सी. ए. पाटील, अभय देसाई यासह तालुक्यातील नरसिंगराव प्रेमी कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते. यशवंंतनगर येथेही स्व. नरसिंगराव पाटील यांच्या समाधिस्थळी तालुकासंघाचे व्यवस्थापक एस वाय पाटील व कर्मचाऱ्यांनी श्रध्दांजली वाहिली.

No comments:

Post a Comment