अडकूर येथील नाना-नानी पार्कसाठी निधी द्या -युनिटी फौंडेशन, पालकमंत्री सतेज पाटील यांचेकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2021

अडकूर येथील नाना-नानी पार्कसाठी निधी द्या -युनिटी फौंडेशन, पालकमंत्री सतेज पाटील यांचेकडे मागणी

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करताना ग्रामस्थ. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       अडकूर (ता. चंदगड) येथे नाना-नानी पार्क, ओपन जीम व अंतर्गत डांबरी रस्त्याकामासाठी, विकास निधी मिळावा अशी मागणी युनिटी फौडेशनच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पालकमंत्री सतेज पाटील याना देण्यात आले. 

      अडकूर मधील अंतर्गत रस्त्या डांबरीकरणासाठी व ओपन जिम व नाना नानी पार्क यासाठी २५ लाखाचा निधी अत्यंत गरजेचा आहे. हा निधी उपलब्ध करून दयावा व आपल्या सहकार्याने ही संकल्पना पुर्ण व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

       काल पालकमंत्री चंदगड तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी व आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांना युनिटी फाउंडेशनच्या वतीने हे निवेदन  देण्यात आले. यावेळी मनोहर देसाई, रमेश सोनार, अनुज पाटील, संजीत आरदाळकर, महेश अंबिटकर, प्रभाकर पवार, चंद्रकांत दड्डीकर, सुरेश पवार, सुधाकर इंगवले, प्रकाश इंगवले, शंकर भेकणे, शिवाजी देसाई, रामदास देसाई, कृष्णा सुतार, संदीप भेकणे, देवानंद सुतार, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment