सहयाद्री वाईल्डलाईफ फौंडेशन मार्फत वन कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, ६०कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2021

सहयाद्री वाईल्डलाईफ फौंडेशन मार्फत वन कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, ६०कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

  

चंदगड येथे वनकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सह्याद्री वाईल्डलाईफचे आशिष पिलाणी 

चंदगड / प्रतिनिधी

           कोल्हापूर येथील सहयाद्री वाईल्डलाईफ फौंडेशन,या सेवाभावी संस्थेमार्फत चंदगड व पाटणे वनक्षेत्रांतील कर्मचाऱ्यासाठी चंदगड वनक्षेत्र कार्यालय येथे हेल्थ कॅपचे आयोजन करण्यात आले. फौंडेशनच्या वतीने आशिष पिलानी, निखिल जोशी, आदित्य जाधव, रोनिक पाटील, मिलिंद घाटगे हे उपस्थित होते. कोल्हापुर येथील डॉ.पृथ्वीराज जाधव व सनराईज हॉस्पिटलचे डॉ. संतोष पाटील यांच्या पथकाने ही आरोग्य तपासणी केली.

वनकर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करतांना डॉक्टर 

         सह्याद्री वाईल्डलाईफचे आशिष पिलाणी यांनी प्रास्ताविक करुन हेल्थ कँपचे महत्त्व विशद केले. हेल्थ कॅपसाठी चंदगड व पाटणे वनक्षेत्रांतील सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजुर हे उपस्थित होते. हेल्थ कँपमध्ये सर्व वनकर्मचारी-यांची शारिरीक तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यासाठी डॉ. किरण परांडीकर यांनी निसर्गातील वनांचे महत्त्व व वनकर्मचाऱ्यामार्फत करणेत येणारे वनांचे रक्षण याविषयी महत्त्व विषद केले  त्यानंतर कर्मचाऱ्यांना दररोजच्या कामांतुन येणारा ताणतणाव दुर करण्यासाठी कर्मचा - यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी पाटणे व चंदगड वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व चंदगड वनक्षेत्राचे माजी वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे हे उपस्थित होते  श्री.आवळे, श्री. राक्षे यांनी मनोगत व्यक्त केली. आभार वनपाल दत्ता पाटील  यांनी व्यक्त केले. यावेळी चंदगड व पाटणे वनक्षेत्रांतील एकूण ६० वनकर्मचारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्ही. क्लेमेंट बेन, मुख्यवनसंरक्षक (प्रा.) कोल्हापुर, आर. आर. काळे, उपवनसंरक्षक कोल्हापुर, नवनाथ कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) कोल्हापुर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. 

No comments:

Post a Comment