निट्टूर येथे गणेशमूर्त्यांच्या रंगकामाना वेग - चंदगड लाईव्ह न्युज

17 August 2021

निट्टूर येथे गणेशमूर्त्यांच्या रंगकामाना वेग

 

गणेश मूर्तीना रंगकाम करताना कारागीर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
निट्टूर (ता. चंदगड ) येथील मूर्तिकारांच्या वतीने गणेशचतुर्थी जवळ येत असलेने गणेशमूर्त्यांच्या रंगकामाला वेग आला आहे .येथील अर्जुन सुतार परिवाराकडून पंचक्रोशीत दरवर्षी 250 ते 400 घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती वितरित होतात. या वर्षी दगडूशेठ ,विठ्ल अवतार,जोतिबा अवतार,लालबागचा राजा आदी विविध रूपातील गणेश मुर्त्या उपलब्ध असून मूर्त्यांना रंगविण्यात नारायण सुतार,नितीन सुतार,विनायक सुतार,साईनाथ पाटील,रोहन सुतार,ज्ञानेश्वर सुतार,सोमनाथ पाटील,कपिल देसाई,पवन पाटील,पूनम सुतार,स्नेहल सुतार आदी कारागीर व्यस्त आहेत. महापूराचा फटका येथेही बसला असून गणेश मूर्ती कारागीर हतबल झाले आहे . त्यातच पाऊस चालू असल्याने रंगकाम सुकवणे अवघड झाले आहे.


No comments:

Post a Comment