आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीचे तालुका कमिटीचे मुल्यमापन पारदर्शी – सभापती ॲड. अनंत कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2021

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीचे तालुका कमिटीचे मुल्यमापन पारदर्शी – सभापती ॲड. अनंत कांबळे यांची पत्रकार परिषदेत माहीती

 

चंदगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सभापती ॲड.  
अनंत कांबळे, शेजारी श्री. सुतार, श्री. कांबळे व श्री. जगताप.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चंदगड तालुका कमिटीने प्रस्ताव दिलेल्या शिक्षकांचे मुल्यमापन हे निःपक्षपाती व सर्व बाबींची योग्य तपासणी करुन केलेले आहे. त्यामुळे ते दोषविरहीत आहे. तालुका कमिटीने आपण केलेल्या मुल्यमापनाचा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवले आहे. मात्र जिल्हा परिषदेने पुर्नमुल्यांकनाचे पाठविलेले पत्र म्हणजे तालुका कमिटीवर दाखविलेला अविश्वास आहे. या निवड कमिटीच्या कामात तालुक्यातील एका जिल्हा परिषद सदस्यांने हस्तक्षेप करुन दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे चुकीचे असल्याचे मत चंदगड पंचायत समितीचे सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी चंदगड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कमिटीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन मुल्यमापन केले आहे. १३ ऑगस्ट ला कमिटीने प्रथम मुल्यामापनाला सुरवात केली. या कमिटीमध्ये सभापती हे या कमिटीचे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख जी. बी. जगताप, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक शशिकांत सुतार अशी कमिटी होती. आमच्या टीमने पारदर्शी मुल्यमापन केले आहे. यात शंका नाही. तरीही फेरमुल्यांकनाचे पत्र आल्याने आम्ही केलेल्या मुल्यांकनाला काय अर्थ राहिला? असा सवाल सभपती ॲड. अनंत कांबळे यांनी बोलताना व्यक्त केला.

        सभापती ॲड. अनंत कांबळे म्हणाले, ``मुल्यांकनामध्ये दोष असल्याची तक्रार यामध्ये भाग घेणाऱ्यां शिक्षकांनी करणे आवश्यक होते. त्यांची कोणतीही तक्रार नाही. मात्र तसे न होता तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार यांनी माझ्यावर मुल्यांकनाबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ही बाब चुकीची आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराचे फेरमुल्यांकन हे माझ्या माहीतीप्रमाणे चंदगडच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असल्याचे माझे म्हणने आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी राजकीय हस्तक्षेत्र होत असेल तर यापुढे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कोणीही अर्ज करणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे राबणाऱ्या शिक्षकांवर कोठेतरी अन्याय होईल. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. २३ ऑगस्टला जिल्हा प्रशासनाकडे कमिटीचे आपला अहवाल सादर केला. त्यानंतर २४ ऑगस्टला यावर आक्षेप घेतला आहे.

        जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार यांनी तालुका कमिटीने केलेल्या मुल्यमापनावर आक्षेप घेतला आहे. तालुका कमिटीने पारदर्शक व सर्व बाबींचा विचार करुन योग्य मुल्यमापन केले आहे. तरीही जिल्हा परिषदेकडून पुन्हा पुर्नमुल्यांकपनाचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे हे फेरमुल्यांकन कशासाठी व कोणत्या कारणाने याचा खुलासा करावा अशी मागणी यावेळी केली.

       पत्रकार परिषदेला मुल्यमापन समिती अध्यक्ष सभापती ॲड. अनंत कांबळे यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख जी. बी. जगताप, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक शशिकांत सुतार उपस्थित होते.

------------------------------------------------

No comments:

Post a Comment