![]() |
स्मार्ट टिव्हीचे उदघाटन करताना मंत्रालय कक्ष अधिकारी घनश्याम पाऊसकर |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
'सर्वांच्या सहकार्यातून गावचा विकास शक्य आहे. यासाठी गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासाच्या मुद्यावर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे ' असे प्रतिपादन मंत्रालयीन अधिकारी घनश्याम पाऊसकर यांनी केले.
दाटे ग्रुप (ता. चंदगड) ग्रामपंचायतीमार्फत डिजीटल अंगणवाडी योजनेतंर्गत वरगाव नाईकवाडा, नरेवाडी व बेळेभाट येथील अंगणवाडयांना चाळीस इंची स्मार्ट टिव्ही प्रदान करण्यात आले.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना डीजीटल ज्ञान व मनोरंजन मिळणे काळाची गरज आहे. यामूळे लहान मुलांच्या प्राथमिक पाया अधिक भक्कम होईल. यावेळी सरपंच अमोल कांबळे, पोलीस पाटील संदीप गुरव, ग्राम पंचायत सदस्य संतोष मोरे, किरण नाईक, स्वाती गुरव,अनिता पाटील, महादेव साबळे, मनोज खरूजकर, बाळू राऊत, महादेव मोरे, ग्रामसेवक मडव,अशोक धुरी,सुरेश धुरी तसेच संबंधित अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि संबंधित मराठी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment