कालकुंद्री येथील शोकसभेत प्राचार्य तुपारे यांना श्रद्धांजली - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2021

कालकुंद्री येथील शोकसभेत प्राचार्य तुपारे यांना श्रद्धांजली

 

व्ही. जी. तुपारे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम पवार ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व्ही. जी. तुपारे (कारवे, ता. चंदगड) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली. शाळेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यरत असलेल्या तुपारे यांच्या अर्ध्या-पाऊण तासातच अपघाती निधनाची बातमी समजताच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांना धक्का बसला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कालकुंद्रीचे ग्रामदैवत कलमेश्वर मंदिर आवारात सरपंच सौ छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी एम जे पाटील, विजय कोकीतकर, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पाटील, अनंत कृष्णा पाटील, विलको कोकितकर आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी उपसरपंच संभाजी पाटील, आर जे पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment