चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना कपडे व आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2021

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना कपडे व आर्थिक मदत

चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) चे सदस्य

कालकुंद्री : प्रतिनिधी

         चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील पूरग्रस्त पत्रकार व नागरिकांसाठी विविध प्रकारचे कपडे व आर्थिक मदत पाठवण्यात आली.

       सन २०१९ नंतर यावर्षी जुलै (२०२१) महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना प्रलयंकारी महापूर आला. यात पंचगंगा व कृष्णा नदीला आलेल्या पुरात शिरोळ तालुक्यातील नागरिकांची घरे, शेती, पिके, व्यापारी पेठा आदींचे अपरिमित नुकसान झाले. यातून पत्रकार देखील सुटले नाहीत. या संकटग्रस्त पत्रकार बांधव नागरिकांसाठी मुंबई मराठी पत्रकार परिषद सलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाने 'खारीचा वाटा' म्हणून मदतीचा हात पुढे केला. यात लहान मुले व प्रौढांसाठी कपडे, साड्या, ब्लाउज आदी कपडे तसेच आर्थिक मदत नुकतीच पाठवण्यात आली.

         चंदगड पत्रकार संघाचे संस्थापक अनिल धुपदाळे यांच्या पुढाकाराने राबवलेल्या उपक्रमात अध्यक्ष- नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष- श्रीकांत पाटील, सचिव- चेतन शेरेगार, राजेंद्र शिवणेकर, प्रदीप पाटील, नंदकिशोर गावडे निवृत्ती हरकारे, संतोष सुतार, लक्ष्मण आढाव, संजय मष्णू पाटील, संजय केदारी पाटील, महेश बसापुरे, प्रकाश ऐनापुरे, उदयकुमार देशपांडे, तातोबा गावडे, संपत पाटील, शहानुर मुल्ला, संदीप तारीहाळकर आदी पत्रकारांनी योगदान दिले. याबद्दल पूरग्रस्तांच्या वतीने शिरोळ तालुका पत्रकार संघाने आभार व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment