सी. एल. न्युज इफेक्ट - कागणी- कालकुंद्री रस्त्यावरील ११ केव्ही धोकादायक विद्युत खांब बदलला - चंदगड लाईव्ह न्युज

24 August 2021

सी. एल. न्युज इफेक्ट - कागणी- कालकुंद्री रस्त्यावरील ११ केव्ही धोकादायक विद्युत खांब बदलला



कालकुंद्री नजीक ११ केव्ही विद्युत वाहिनीचा गंजलेला जुना खांब 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           कागणीहून कालकुंद्री कडे जाणाऱ्या अकरा केवी विद्युत वाहिनीचा लोखंडी खांब पूर्णपणे गंजल्यामुळे धोकादायक बनला होता. कालकुंद्री येथील काशिलिंग दूध संस्थेसमोर असणारा हा खांब तात्काळ बदलावा असे वृत्त चंदगड तालुक्याचे मुख्य पत्र बनलेल्या सी. एल. न्यूज ने १२ मे रोजी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत वीज वितरण कंपनीने हा लोखंडी धोकादायक खांब काढून नवीन बसवला. याबद्दल सी. एल. न्यूजचे अभिनंदन होत आहे.

वीज वितरण कंपनीने बातमीची दखल घेवून बदललेला खांब.

    नेसरी पासून कोवाड भागात आलेल्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीतून कागणी ते कालकुंद्री, कुदनुर,  राजगोळी परिसरात या  वाहिनीतून वीज पुरवठा केला जातो. या वाहिनीला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली असून इतक्या वर्षात विविध कारणांनी अनेक खांब गंजून जीर्ण व धोकादायक बनले आहेत. कालकुंद्री येथील दूध संस्थेसमोरील  या खांबाने गंजल्यामुळे तुटून जागाच बदलली होती. वादळी वाऱ्याच्या वेळी हा खांब घड्याळाच्या लंबका प्रमाणे धोकादायकरित्या हलत असे.  याच खांबानजीकच्या झाडाच्या फांद्या यांनीही अनेक वेळा पेट घेतला होता. मुख्य रस्त्याला लागूनच असल्यामुळे वादळी वारा प्रसंगी इथून जाताना वाहने, नागरिक, पाळीव जनावरांसाठी जीवावरील खेळ बनला होता. वीज वितरण कंपनीने नवीन खांब बसवल्यामुळेधोका टळलेला आहे याबाबत परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment