तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार - जिल्हाप्रमुख देवणे, तडशिनहाळ फाटा येथे बांधकाम कल्याणकारी असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2021

तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार - जिल्हाप्रमुख देवणे, तडशिनहाळ फाटा येथे बांधकाम कल्याणकारी असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन

 

तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलताना संग्राम कुपेकर,बसलेले जिल्हाप्रमुख देवणे,उपजिल्हाप्रमुख खांडेकर, सौ.मळवीकर

चंदगड / प्रतिनिधी 

         चंदगड तालुक्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आज ह्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील कामगारांची नोंदणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाकडे करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम अध्यक्ष कल्लापा निवगीरे व त्यांचे सर्व पदाधिकारी चांगले काम करीत आहेत,त्यामुळे  गवंडी बांधवानी या संघटनेचे सभासदत्व घ्यावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यानी केले.

           तडशिनहाळ फाटा (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन तडशिनहाळ या संघटनेच्या कार्यालयाचे व कामगार सेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष कल्लाप्पा निवगिरे यानी प्रास्ताविकात संघटनेची गरज गवंडी बांधवाना का आहे,याची माहिती दिली.

           शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते यावेळी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. संघटक संग्राम  कुपेकर म्हणाले, ``तालुक्यातील सर्व कामगारांनी एकत्रीत होऊन चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन च्या माध्यमातून नोंदणी करावी. त्या साठी कामगारांना शासनाकडून  मिळणाऱ्या इतर सर्व योजना मिळवण्यासाठी लागेल ते सहकार्य करू. उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी चंदगड तालुक्यात बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार भरपूर आहेत. पण त्यांना काम करताना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी व त्याना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतेच कार्यालय नव्हते. पण या संघटनेचे कार्यालय तालुक्यात आज स्थापन करून संघटनेचे अध्यक्ष कल्लापा निवगीरे व त्यांच्या सर्व पदाधिकारी यांनी कामगारांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना सर्व योजना मिळवून देण्यासाठी चांगले काम केले आहे. त्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही करू.

          यावेळी सौ. संज्योती मळविकर, सौ. शांताताई जाधव, सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार, सटूप्पा सुतार, अवधूत भुजबळ, शिवाजी पाटील, शिवाजी सुतार, मोनेश्री चव्हाण, सुरेश चिचंणगी,मारूती कांबळे यासह संघटनेचे पदाधिकारी गवंडी बांधव, शिवसैनिक उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष बाबू चौगले यांनी मानले.

No comments:

Post a Comment