![]() |
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील दुध शीतकरण केंद्रात बोलताना आमदार राजेश पाटील, शिखरे व कुंभार आदी. |
माणगाव / प्रतिनिधी
प्रत्येक राज्यात दुधाचा ब्रँड आहे तसा गोकुळ दूध संघ महाराष्ट्राचा ब्रँड व्हावा असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यानी केले. तावरेवाडी (ता. चंदगड) येथील दूध शीतकरण केंद्रात झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) जिल्ह्यातील म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमातंर्गत के. डी. सी. सी. बँक अधिकारी व गोकुळ दूध संघ अधिकारी यांच्या कार्यशाळेत बोलत होते.
आमदार पाटील पूढे म्हणाले, ``सध्या गोकुळ संघात दीड लाख लिटरहुन अधिक दूध महानंद, मुंबई येथे पॅकिंग होत आहे. ते काबीज करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सध्या महाराष्ट्रात प्रगतीपथावर असलेल्या व शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला संघ म्हणजे गोकूळ दूध आहे. शेतक-यासाठी गोकूळ दूध संघ राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी के. डी. सी. सी. चे श्री. नाईक, बँक निरीक्षक जयवंत कुंभार, बाबुराव खवणेवाडकर, एन. के पाटील, गोकूळ दूध संघाचे अधिकारी बी. आर. पाटील, बापू देसाई, अनिल शिखरे व सुपरवायझर व बँक निरीक्षक उपस्तिथ होते, स्वागत कुंभार, यांनी केले तर आभार अनिल शिखरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment