शे. का. पक्ष चंदगडच्या वतीने स्व.गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2021

शे. का. पक्ष चंदगडच्या वतीने स्व.गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

गणपतराव देशमुख

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे (शुक्रवारी) रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने पक्षाचे फार मोठी हाणी झाली आहे. अशा शब्दांत चंदगड तालुका शे.का.पक्षाचे चिटणीस चंद्रकांत बागडी यांनी श्रध्दांजली वाहताना व्यक्त केले. 

          साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या तळागाळातील लोकांच्या हितासाठी झटणारे लोकप्रिय नेते,  सलग अकरा वेळा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन त्यांनी उत्तम संसदपटू म्हणून नावलौकिक मिळविला होता. आमदार असुनही ते नेहमीच एस. टी. ने प्रवास करत या कृतीतून त्यांच्या साध्या राहणीचे दर्शन होते. त्यांच्या निधनाने पक्षाचे फार मोठं नुकसान झाले आहे.

         यावेळी अॅड. रवी रेडेकर, भरमु सदावर, संदिप पाटील, प्रकाश पाटील, जानबा वर्पे, नारायण गावडे, युवराज कुट्रे, भरमु पेडणेकर, सोमनाथ खनगुटकर, प्रकाश गावडे, सुरेश आवडण, प्रकाश सदावर, सुरेश गायकवाड, परशुराम निटूरकर, बाळू कोरेकर इत्यादी उपस्थित होते.No comments:

Post a Comment