![]() |
नगमा इम्रान राजगुरु |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील आझाद नगर मधून नगमा इम्रान राजगुरु (वय वर्षे -२८) ही महिला राहत्या घरातून १८ जुलै २०२१ पासून बेपत्ता झाल्याची तक्रार पती इम्रान आयुबशह राजगुरू (वय ३०, रा. आझाद नगर, चंदगड) यांनी चंदगड पोलीसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ``नगमा राजगुरू या आपल्या दोन मुलांसह आझाद नगर, चंदगड येथे राहत होती. १८ जुलै रोजी इम्रान हे नेहमीप्रमाणे सकाळी साडे आठच्या सुमारास सुरभी बुक स्टॉल येथे दुकानात कामाला गेले होते. सायंकाळी सव्वा चार वाजता घरी आले असता त्यांची पत्नी ही घरी दिसली नाही. त्यामुळे इम्रान याने शेजारी, पै पाहुणे, मित्र यांचेकडे शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.
तिचे वर्णनपुढीलप्रमाणे - नगमाची उंची पाच फूट दोन इंच, डोळे काळे, रंगाने गोरी, नाक लांब सरळ, अंगात मेहंदी रंगाची कमीज, निळ्या रंगाची सलवार, पायात चॉकलेटी रंगाचे सॅण्डल असून ती मराठी व हिंदी भाषा बोलते. अशा वर्णनाची चंदगड पोलीसात हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार तक्रार दाखल केली असून वरील वर्णनाची महिला मिळून आल्यास चंदगड पोलीसांशी अथवा ०२३२०-२२४१३३ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment