लकी युवा फाउंडेशन मार्फत कार्वे, हलकर्णी, पाटणे फाटा येथे वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

लकी युवा फाउंडेशन मार्फत कार्वे, हलकर्णी, पाटणे फाटा येथे वृक्षारोपण

  

लकी युवा फाउंडेशन मार्फत हलकर्णी महाविद्यालयात वृक्षारोपण करताना प्राचार्य पी ए पाटील, बाजूला प्रा जरळी,लखन बिर्जे आदी.

चंदगड / प्रतिनिधी

        मजरे कारवे (ता. चंदगड) येथील लकी युवा फाउंडेशन मार्फत हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,पाटणे फाटा येथील व्ही के चव्हाण महाविद्यालय व कार्वे गावाजवळील शेततळ्याशेजारी देशी झाडे लावण्यात आली. 

       उपसरपंच पांडुरंग बेनके, फाउंडेशनचे अध्यक्ष लखन बिर्जे, ग्रामपंचायत सदस्य, दिलीप परीट, फाउंडेशन चे सदस्य, कृष्णा लोंढे, आनंद सुतार, गजानन घाटगे, सदानंद कांबळे, सचिव राजेंद्र इंजल, भारतीय सैन्य दलाचे जवान मयूर गावडे, पोलीस पाटील सचिन कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सकाळच्या सत्रात हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्याचबरोबर पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए. पाटील समन्वयक डॉ.आय. आर जरळी, कार्यालय अधीक्षक प्रशांत शेंडे, प्रकल्प अधिकारी डॉ.राजेश घोरपडे, प्राध्यापक चंद्रकांत पोतदार, प्राध्यापक चंद्रकांत तेली यांच्यासह व्ही. के. चव्हाण पाटील या महाविद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वैभव पाटील, आनंद भोसले, यांच्यासह  विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लकी युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष लखन बिर्जे यांनी तर आभार रुपेश मऱ्यापगोळ यांनी मानले.

No comments:

Post a Comment