मुदत संपली तरी रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, नगरसेवक हळदणकर यांचे सार्वजनिक बांधकामला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

05 August 2021

मुदत संपली तरी रस्त्याच्या कामाचा पत्ता नाही, नगरसेवक हळदणकर यांचे सार्वजनिक बांधकामला निवेदन

कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग कोल्हापूर यांना निवेदन देतेवेळी नगरसेवक आनंद हळदणकर ,नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, सचिन नेसरीकर  

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेसरी ते तिलारी घाट दरम्यान च्या रस्ता कामी कोणतीच हालचाल नाही या कामाची मुदत सन. २०२०ला संपली आहे. मात्र कामात प्रगती नाही संंबंधित "तिलारी हायवेज प्रोजेक्ट लिमिटेड"या कंपनीने वेळेत काम पूर्ण केले नाही, म्हणून कंपनीवर नियमानुसार कारवाई व दंड करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नुकताच चंदगड नगरपंचायत चे नगरसेवक आनंद हळदणकर यांनी कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग कोल्हापूर यांना दिले. यावेळी नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, सचिन नेसरीकर  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment