श्री देव वैजनाथ शिक्षक सहकारी पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा - चंदगड लाईव्ह न्युज

30 August 2021

श्री देव वैजनाथ शिक्षक सहकारी पतसंस्थेची रविवारी वार्षिक सभा कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      पाटणे फाटा, मजरे कारवे (ता. चंदगड) येथील श्रीदेव वैजनाथ शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा रविवार दि. ५ रोजी आयोजित केल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन व विद्यामंदिर बसर्गे येथील अध्यापक भरमू तारिहाळकर (कागणी) व मॅनेजर पुंडलिक पाटील (मलतवाडी) यांनी दिली.

सदर सभा आॅनलाईन पद्धतीने आयोजित केली असून, सभेची लिंक शनिवार दि. ४ रोजी व्हाट्सअॅपद्वारे पाठविण्यात येईल.

अहवाल आपल्यापर्यंत वेळेत पोहोच करण्यात येतील तत्पुर्वी प्रत्येक सभासदाला अहवालाची PDF फाईल पाठविण्यात येत असून सभासदांना प्रश्न विचारावचे असल्यास दि. ०४ रोजी पर्यंत संस्था कार्यालयात कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात पाठवावे, असे आवाहन चेअरमन भरमू तारिहाळकर, व्हाईस चेअरमन अनंत मोटर (विद्या मंदिर कानूर खुर्द), संचालक मंडळ, सुकाणू कमिटी, सल्लागार मंडळ यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment