![]() |
संदीप नांदवडेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका युवक काँग्रेस च्या तालुकाध्यक्षपदी संदीप शहाजी नांदवडेकर यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र काँग्रेस चे काॅग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड .संजय सरदेेसाई यानी कोल्हापूर येेेथे पक्षाच्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित दिले.
राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी,खास. राहुल गांधी जी यांचे विचार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करावे तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व गृहराज्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना अपेक्षित असलेले कार्य आपण करावे असे पत्रात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment