![]() |
सिद्धार्थ देसाई |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
सलग ७ हंगाम गाजत असलेल्या प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाला येत्या डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे . त्यापूर्वी २ ९, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यंदा लिलावाची पद्धत बदलण्यात आली असून खेळाडूंचे वेगवेगळ्या विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, या लिलावात कोल्हापूर जिल्हयातील चंदगड तालूक्यामध्ये असलेल्या हुंदळेवाडीचा स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला तब्बल १ कोटी ३० लाख इतकी किंमत. मिळाल. सिद्धार्थला तेलगु टायटन्सने संघात कायम केले आहे. त्याला संघात घेण्यासाठी युपी योद्धा आणि पटना पायरेट्समध्ये चढाओढ सुरु होती. अखेर युपी योद्धाने १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत बोली जिंकली. मात्र , त्याचवेळी तेलगु टायटन्सने फार विचार न करता एफबीएम कार्डचा वापर केला आणि सिद्धार्थला १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत आपल्या संघात कायम केले . सिद्धार्थने मागील हंगामात तेलगुकडून चांगला खेळ केल्याने पदार्पणाच्या हंगामात रेडींग आणि टॅकल पॉईंट मिळून २२१ पॉइंट मिळवले होते. यातील २१८ पॉइंट्स त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. तो ६ व्या मोसमात सर्वाधिक रेडींग पॉइंट मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता. सोमवारी (३० ऑगस्ट) परदेशी खेळाडूंचे, तसेच भारताच्या अ गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये भारताच्या अ लिलावाच्या गटात चढाईपटूंच्या (रेडर्स) यादीत सिद्धार्थचा समावेश होता. त्याची मुळ किंमत ३० लाख होती.
No comments:
Post a Comment