भूस्खलन झाल्याने बसमधील चाळीस जण गाडल्याची भिती, कोठे घडली ही घटना.......वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2021

भूस्खलन झाल्याने बसमधील चाळीस जण गाडल्याची भिती, कोठे घडली ही घटना.......वाचा........

हिमाचल प्रदेश मधील किन्नौरमध्ये शोधकार्य सुरु असताना. 

चेतन शेरेगार / चंदगड - प्रतिनिधी

           हिमाचल प्रदेश मधील किन्नौर मध्ये आज दुपारी झालेल्या भूस्खलन मध्ये हिमाचल प्रदेश स्टेट ट्रान्सपोर्टची एक बस गाडली गेल्यामुळे बसमधील सुमारे चाळीस जन गाडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. डेप्युटी कमिशनर सादिक हुसैन यांनी या घटनेची माहिती दिली आहे.  

          हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. एका महिन्यात भूस्खलन ची दुसरी घटना आहे. या घटनेत प्रमाणे या ठिकाणी आणखी कोणती घटना घडली आहे का याबाबत स्पष्ट नाही. घटना ठिकाणी त्वरित एनडिआरएफ ची टीम दाखल झाली आहे व शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. शोधकर्यात स्थानिक ही सहभागी झाले आहेत. हिमाचल प्रदेश स्टेट ट्रान्सपोर्टच्या या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी प्रवास करत होते असा अंदाज आहे.


No comments:

Post a Comment