महाराष्ट्र शासनाकडून चंदगड तालुक्यातील आदिवासींना अनुदान व दुधाळ जनावरे - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2021

महाराष्ट्र शासनाकडून चंदगड तालुक्यातील आदिवासींना अनुदान व दुधाळ जनावरे

 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाकडून चंदगड तालुक्यातील आदिवासी महादेव कोळी जमातीच्या शेतकऱ्यांसाठी खावटी अनुदान व दुधाळ जनावरांचे वाटप होणार आहे. या जमातीचे लोक चंदगड तालुक्यात कामेवाडी, चिंचणे व कल्याणपुर आदी गावात राहतात. त्यांना ठक्कर बाप्पा आदिवासी विकास निधी मधून या सुविधा देण्यात येणार आहेत. याशिवाय आदिवासी शेतकऱ्यांच्या सातबारा पत्रकावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६अ 'आदीवासी शेतजमीन नोंदी' जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या पत्राद्वारे मंजुर केल्या आहेत. त्यांच्या वाटपाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव (पूणे) मार्फत आदिवासी विभागाचे कर्मचारी या सुविधा घेऊन उपस्थित राहणार आहेत.

         आदिवासी विभागाकडून या वितरण कार्यक्रमासाठी चंदगड चे आमदार राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी ( महसूल) बाबासाहेब वाघमोडे,  तहसीलदार विनोद रणवरे, जिप. सदस्य कल्लापा भोगण, पंस. सदस्या नंदिनी पाटील, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास सर्व समाज बांधव व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन महादेव कोळी जमातीचे अध्यक्ष व कामेवाडीचे सरपंच बसवाणी परशराम पाटील, कार्यकारी अध्यक्ष शिवलिंग रामा डांगे व कार्यकारी मंडळाने केले आहे.

No comments:

Post a Comment