चंदगड नगरपंचायतीमार्फत तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये 115 गणेशमूर्तींचे विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2021

चंदगड नगरपंचायतीमार्फत तयार केलेल्या कृत्रिम तलावामध्ये 115 गणेशमूर्तींचे विसर्जन

चंदगड नगरपंचायती मार्फत तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मुर्तीचे विसर्जन करताना ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेकांनी गणेशोत्सव साजरा केला नाही किंवा अतिशय साध्या पद्धतीने केला. चंदगड नगरपंचायती तर्फे कृत्रिम तलावांचे गणेश मुर्ती विसर्जनासाठी नियोजन केलेले होते. यामध्ये हेरे रस्ता घाट आणि कॉलेज रोड येथील तलावांमध्ये मिळून 115 गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. या सर्व भाविकांचे नगरपंचायती तर्फे खूप आभार अभिजित जगताप मुख्य अधिकारी व नगराध्यक्षा सौ प्राची दयानंद कानेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, दिलीप चंदगडकर विरोधी पक्ष नेता बाळासाहेब हळदणकर शिक्षण सभापती यांनी आभार व्यक्त केले त्याचबरोबर निर्माल्यही संकलन करण्यात आले त्यामुळे नदी प्रदूषण कमी करण्यामध्ये याचा निश्चितच हातभार लागणार आहे. त्याच बरोबर पाण्यामधील जैवविविधतेला सुद्धा आपण या उपक्रमाद्वारे संरक्षित करीत आहोत.







No comments:

Post a Comment