![]() |
बेपत्ता जोतिबा वांद्रे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथून जोतिबा भावकू वांद्रे (वय ७५ वर्षे) हे १२ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. रविवारी सकाळी शेताकडे जाऊन येतो, असे सांगून ते बाहेर गेले होते. मात्र ते अद्याप घरी परत आले नाहीत. अंगात स्वेटर, हिरव्या रंगाचा शर्ट, निळी पँन्ट व रंगीबेरंगी टॉवेल आहे. गेले अनेक दिवस कुटूंबिय त्यांचा शोध घेत आहेत. पण त्यांचा शोध लागत नाही. संबधित व्यक्ती कोठे आढळल्यास विजय वांद्रे फोन -7507346682 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस व कुंटूबियाकडून करण्यात आले आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
No comments:
Post a Comment