महिला सबलीकरण काळाची गरज -सौ. माधुरी सावंत भोसले, किणी येथे कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

21 September 2021

महिला सबलीकरण काळाची गरज -सौ. माधुरी सावंत भोसले, किणी येथे कार्यक्रम

महिलांना मार्गदर्शन करताना सरपंच माधुरी सावंत -भोसले


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        महिलावरील अत्याचार रोखायचे  असेल तर महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे असल्याचे विचार उत्साळीचा सरपंच सौ. माधुरी  सावंत -भोसले यांनी व्यक्त केले.

        किणी (ता. चंदगड) येथे  जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मार्फत ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कलमेश्वर देवालयात लीना लोबो यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच संदीप बिर्जे यांच्या उपस्थित हळदी कुंकू समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माधुरी संतोष सावंत - भोसले  बोलत होत्या.

       सरपंच संदीप बिर्जे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ठ केला. या प्रसंगी गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी अंगणवाडी शिक्षिका जयवंती जोशीलकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात लीना लोबो यांनी सुद्धा महिलांना हळदी कुंक कार्यक्रमाचे महत्व पटवून योग्य ते मार्गदर्शन केले. 

        या प्रसंगी उपसरपंच जोतीबा हुंदळेवाडकर, ग्रामपंचायत सदस्या संगीता मनगुतकर, दीपिका गणाचारी मंडळाचे अध्यक्ष जोतीबा व्हडगेकर, संजय कुट्रे, सुनील मनवाडकर, संभाजी हुंदळेवाडकर, विनायक बिर्जे, अनिल हुंदळेवाडकर, प्रभाकर सुतार, जोतीबा बिर्जे, आनंदा जोशीलकर तसेच गावातील महिला मंडळ, प्रगती तनिष्का गट व गावातील महिला उपस्थित होत्या. सुत्रसंचलन मेघा कुंभार यांनी केले तर आभार सुवर्णा हनुरकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment