गारगोटी -नेसरी - अडकूर- चंदगड ते तिलारी या रस्त्याच्या कामाचा ठेकेदार जितेंद्र सिंह (तिलारी गारगोटी इन्फ्रास्टकचर प्रा. लि.) यांच्याकडून टर्मिनेट करून दुसऱ्या योग्य अशा ठेकेदारास देण्यात यावे अशी मागणी चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यानी सार्वजनिक बांधकामं मंत्री अशोक चव्हण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ``चंदगड विधानसभा मतदार संघातील गारगोटी -नेसरी - अडकूर- चंदगड ते तिलारी या रस्त्याच्या कामाचा ठेका ठेकेदार जितेंद्र सिंह याना देण्यात आला आहे. पण या ठेकेदाराने गेल्या दोन वर्षात सर्वच काम अर्धवट ठेवले आहे. या संदर्भात संबधीत खात्याने ठेकेदारास वारंवार सूचना देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. मलगेवाडी -अडकूर पासून चंदगड नगरपंचायत हद्दीमधील रस्ता जागोजागी खोदून तो अर्धवट ठेवला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वच वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर याच ठेकेदाराने जिल्ह्यात केलेल्या इतर रस्ते कामांच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे या ठेकेदारावर कारवाई करून अन्य ठेकेदाराकडे काम देऊन रस्ता त्वरीत पूर्ण करण्याची मागणी आमदार राजेश पाटील यानी केली आहे.
No comments:
Post a Comment