कै दशरथ पाटील यांनी शिवसैनिकांसमोर आदर्श निर्माण केला - उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2021

कै दशरथ पाटील यांनी शिवसैनिकांसमोर आदर्श निर्माण केला - उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर

कालकुंद्री येथे कै दशरथ पाटील यांच्या शोकसभा प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिक.

कालकुंद्री ( प्रतिनिधी)

          समर्पित शिवसैनिक कसा असावा! याचा आदर्श कै दशरथ पाटील यांनी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना घालून दिला आहे. असे गौरवोद्गार उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी व्यक्त केले. ते कालकुंद्री, (ता. चंदगड) येथे दिवंगत शिवसैनिक दशरथ हनमंत पाटील यांच्या कालकुंद्री शाखेच्या वतीने आयोजित शोकसभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

     दुसऱ्यांच्या म्हशी पाळणे, मोलमजुरी वर उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब, निरक्षर दशरथ पाटील, (वय ७५) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. १९८५ मध्ये कालकुंद्री शाखेच्या स्थापनेपासून ३७ वर्षे तहयात निष्ठावंत व स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. गावातील शिवसैनिकांना एकसंघ ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गरीब असूनही कधी लाचारी पत्करली नाही. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी गाव व परिसरातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांत एक आदराचे स्थान निर्माण केले होते. हे शोकसभेतील उपस्थिती वरून दिसून येते. शिवसेनाप्रमुखांचे विचार किती खोलवर रुजले आहेत याचे दशरथ पाटील हे उत्तम उदाहरण आहे अशा शब्दात खांडेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. एका सामान्य शिवसैनिकाच्या निधनानंतर शोकसभेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या कालकुंद्री शाखेचे वेगळेपण दिसून येते. असेही शेवटी खांडेकर यांनी सांगितले. मधुकर कोकितकर म्हणाले गावातील शिवजयंती उत्सव, लेझीम पथक, नाट्य कलापथक यातील त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा असायचा. शोकसभेत तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, अशोक वरपे, विजय कोकितकर, आदींनी मनोगते व्यक्त केली यावेळी उपतालुकाप्रमुख किरण कोकितकर, कोवाड शहर प्रमुख शिवप्रसाद अंगडी, नारायण जोशी, नरसिंग पाटील, शंकर पाटील, गुरुनाथ पाटील, अशोक पाटील, प्रभाकर कोकितकर, नारायण पाटील आदींसह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले.No comments:

Post a Comment